Class 5: Marathi Sulabhbharati Chapter 23 solutions. Complete Class 5 Marathi Sulabhbharati Chapter 23 Notes.
Maharashtra Board Solutions for Class 5- Marathi Sulabhbharati: Chapter 23- प्रामाणिक इस्त्रीवाला
Maharashtra Board 5th Marathi Sulabhbharati Chapter 23, Class 5 Marathi Sulabhbharati Chapter 23 solutions
Questions and Answers
1. कोण ते लिहा.
प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(अ) पाचवीत शिकणारी
(आ) कपड्यांच्या घड्या करणारा
(इ) आईजवळ पैसे देणारे
(ई) पैसे परत करणारे
(उ) पैसे मोजून घेणारी
(ऊ) दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे
उत्तर:
(अ) शिवानी
(आ) भाऊ (शिवराज)
(इ) बाबा
(ई) दामूकाका
(उ) आई
(ऊ) बाबा
2. कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
प्रश्न (अ)
“त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीतच भरून दे.’
उत्तरः
असे, आई शिवानीला म्हणाली.
प्रश्न (आ)
“काय रे बाबा? कपडे आणलेस का?”
उत्तर:
असे, आई दामूकाकांना म्हणाली.
प्रश्न (इ)
“तुझा प्रामाणिकपणा मला आवडला.”
उत्तरः
असे, बाबा दामूकाकांना म्हणाले.
प्रश्न (ई)
“आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो.”
उत्तरः
असे, दामूकाका बाबांना म्हणाले.
3. ‘प्रामाणिकपणा’ यासारखे आणखी शब्द लिहा.
प्रश्न 1.
‘प्रामाणिकपणा’ यासारखे आणखी शब्द लिहा.
उत्तर:
- शहाणपणा
- मूर्खपणा
- वेडेपणा
- चांगुलपणा
- आगाऊपणा
- शिष्टपणा
4. गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.
प्रश्न 1.
गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा.

उत्तरः
- इस्त्रीवाले
- रिक्षावाले
- भाजीवाले
- फळवाले
- झाडूवाले
5. खालील शब्द वाचा व असेच लिहा.
प्रश्न 1.
खालील शब्द वाचा व असेच लिहा.
स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.
6. वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात ‘✓’ अशी खूण करा.
प्रश्न 1.
वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात ‘✓’ अशी खूण करा.

उत्तरः
7. खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा.
प्रश्न 1.
खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा.
उत्तर:
8. रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
प्रश्न 1.
रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.
उत्तरः
| वाक्ये | नाम | क्रियापद |
| 1. ………………. गवत खातो. | हत्ती | खातो |
| 2. ……………….. गवत खाते. | हत्ती | खाते |
| 3. …………………. पत्र लिहिते. | मिनल | लिहिते |
| 4. ते ………………. सुंदर आहे. | देऊळ | आहे |
| 5. ……………… पुस्तक वाचतो. | मुलगा | वाचतो |
| 6. ते ……….. मोठे आहे. | घर | आहे |
9. रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
प्रश्न 1.
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
(अ) सुधीर गोष्ट ………………..
(आ) ते झाड उंच ……………….
(इ) रोझी गाणे …………………..
(ई) ती वेल हिरवीगार ………………
उत्तरः
(अ) ऐकतो
(आ) आहे
(इ) गाते
(ई) आहे
10. चौकटीत काही अक्षरे दिली आहेत. त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्या शब्दांची कार्डे तयार करा.
प्रश्न 1.
चौकटीत काही अक्षरे दिली आहेत. त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. त्या शब्दांची कार्डे तयार करा.

Additional Important Questions and Answers
एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
शिवानीच्या घरात कोणकोण राहत होते?
उत्तरः
शिवानीच्या घरात आई, बाबा, भाऊ शिवराज आणि शिवानी हे सर्व राहत होते.
प्रश्न 2.
घरची सगळी कामे कोण करते?
उत्तरः
घरची सगळी कामे आई करते.
प्रश्न 3.
कपडे वाळल्यानंतर भाऊने काय केले?
उत्तर:
कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले.
प्रश्न 4.
बाबांनी आईला पैसे दिल्यावर तिने काय केले?
उत्तर:
बाबांनी आईला पैसे दिल्यावर तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यांत ठेवले.
प्रश्न 5.
आई कावरीबावरी का झाली?
उत्तर:
बाबांनी दिलेले पैसे न सापडल्यामुळे आई कावरीबावरी झाली.
प्रश्न 6.
इस्त्रीवाल्याला पैसे कुठे सापडले?
उत्तरः
इस्त्रीवाल्याला पैसे कपड्यांच्या घड्यांमध्ये सापडले.
प्रश्न 7.
बाबा बक्षीस म्हणून 100 रूपये देऊ लागल्यावर दामूकाका काय म्हणाले?
उत्तर:
“आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो’.
एका शब्दात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
एका शब्दात उत्तरे लिहा.
- शिवानी कोणत्या इयत्तेत शिकत होती?
- बाबा बाहेरून किती वाजता आले?
- शिवानीचा भाऊ कुठे गेला होता?
- इस्त्रीवाल्या काकांचे नाव काय होते?
- सवयीप्रमाणे आई पैसे कुठे शोधू लागली?
- बाबा बक्षीस म्हणून दामूकाकाला किती पैसे देऊ लागले?
उत्तरः
- पाचव्या
- पाच
- खेळायला
- दामू
- कपाटात
- शंभर रुपये
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
इस्त्रीवाल्या दामूकाकांचा प्रामाणिकपणा कोणत्या गोष्टीवरून दिसून येतो?
उत्तरः
शिवानीच्या बाबांनी ठेवायला दिलेले पैसे आईकडून चुकून इस्त्रीच्या घड्यांमध्येच राहिले. हे कपडे दामूकाका इस्त्रीवाल्याने जेव्हा इस्त्री करण्यासाठी घेतले, तेव्हा कपड्यांच्या घड्यांमध्ये त्यांना हे पैसे सापडले. इस्त्रीचे कपडे परत करताना सापडलेले पैसेही त्यांनी परत केले. इस्त्रीवाल्या दामूकाकांचा प्रामाणिकपणा या गोष्टीवरून दिसून येतो.
प्रश्न 2.
आईने कोणती चूक केली?
उत्तरः
बाबांनी आईजवळ पैसे दिले व तिला ते ठेवायला सांगितले. आईने कामाच्या गडबडीत ते पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यांत ठेवले व ती कामात व्यग्र झाली. दोन दिवसांनंतर बाबांनी जेव्हा पैसे मागितले तेव्हा ते सापडले नाहीत. आईने पैसे योग्य ठिकाणी म्हणजेच कपाटात ठेवले नाहीत ही चूक केली.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
प्रश्न 1.
“पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या.”
उत्तर:
असे, दामूकाका आईला म्हणाले.
प्रश्न 2.
“पैसे बरोबर आहेत’.
उत्तर:
असे, बाबा दामूकाकांना म्हणाले.
प्रश्न 3.
“पैसे गेले कुठे?”
उत्तर:
असे, आईने स्वत:लाच विचारले.
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खाली काही वाक्प्रचार दिले आहेत, त्यांचे अर्थ कंसात दिले आहेत. कंसातील योग्य अर्थ वाक्प्रचाराच्या बाजूला लिहा. (कामात मग्न होणे, गाढ विचार करणे, तपासून बघणे, रागावणे, मेहनत करणे, प्रशंसा करणे.
उत्तर:
वैतागणे – रागावणे, कामात गढून जाणे – कामात मग्न होणे, शोधाशोध करणे – तपासून बघणे, कौतुक करणे – प्रशंसा करणे, विचारात पडणे – गाढ विचार करणे, कष्ट करणे – मेहनत करणे
प्रश्न 2.
वाक्ये वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात ‘✓’ अशी खूण करा.
उत्तरः
प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
- कुटुंब
- घड्या
- अभ्यास
- पिशवी
- कपडे
- बक्षीस
- मदत
उत्तरः
- परिवार
- दुमड
- अध्ययन
- थैली
- वस्त्र
- पुरस्कार
- साहाय्य
प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- छोटे
- काम
- घाई
- दे
- संध्याकाळ
- गरीब
उत्तर:
- मोठे
- कार्य
- विलंब
- घे
- सकाळ
- श्रीमंत
प्रश्न 5.
वचन बदला.
- काम
- कपडे
- टेबल
- कपाट
- खिसा
- पैसा
- घडी
- बक्षीस
उत्तर:
- कामे
- कपडा
- टेबले
- कपाटे
- खिसे
- पैसे
- घड्या
- बक्षीसे
प्रश्न 6.
लिंग बदला.
- आई
- भाऊ
- काका
- दादा
उत्तर:
- बाबा
- बहीण
- काकू/काकी
- वहिनी
पदयपरिचय:
या पाठात एका प्रामाणिक इस्त्रीवाल्याचे वर्णन आले आहे. इस्त्रीच्या कपड्यांबरोबर नकळत आलेले पैसे इस्त्रीवाला प्रामाणिकपणे परत करतो आणि कौतुकास पात्र ठरतो, अशी ही कथा आहे.
शब्दार्थ:
- कुटुंब – परिवार (family)
- घडी – दुमड (a fold)
- सवय – एखादी गोष्ट नेहमी करण्याचे वळण (a habit)
- वाळत घालणे – सुकवणे – (To dry the clothes)
- वैतागणे – त्रासणे (To get disgusted)
- कावरीबावरी – बेचैन (restlessness)
- प्रामाणिकपणा – सचोटी (honesty)
- बक्षीस – इनाम (a reward)
- गरीब – दरिद्री – poor
- कष्ट – मेहनत (hardwork)
- आकृती – प्रतिमा, चित्र (image)
- कौतुक – प्रशंसा (admiration)
Download PDF
Maharashtra Board Solutions for Class 5- Marathi Sulabhbharati: Chapter 23- प्रामाणिक इस्त्रीवाला
Chapterwise Maharashtra Board Solutions Class 5 Marathi Sulabhbharati :
- Chapter 1- नाच रे मोरा
- Chapter 2- हत्तीचे चातुर्य
- Chapter 3- खेळूया शब्दांशी
- Chapter 4- हि पिसे कोणाची
- Chapter 5- डराव डराव
- Chapter 6- ऐकुया खेळूया
- Chapter 7- खेळत खेळत वाचुया
- Chapter 8- कोणापासून काय घ्यावे?
- Chapter 9- सिंह आणि बेडूक
- Chapter 10- बैलपोळा
- Chapter 11- इंधनबचत
- Chapter 12- बोलावे कसे?
- Chapter 13- अनुभव - १
- Chapter 14- चित्रसंदेश
- Chapter 15- नदीचे गाणे
- Chapter 16- मी नदी बोलते
- Chapter 17- आमची सहल
- Chapter 18- पैशांचे व्यवहार
- Chapter 19- अनुभव-२
- Chapter 20- गमतीदार पत्र
- Chapter 21- छोटेसे बहीणभाऊ
- Chapter 22- वाचूया लिहूया
- Chapter 23- प्रामाणिक इस्त्रीवाला
- Chapter 24- ऐका पहा करा
- Chapter 25- मालतीची चतुराई
- Chapter 26- पतंग
- Chapter 27- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- Chapter 28- फुलपाखरू आणि मधमाशी