Class 5: Marathi Sulabhbharati Chapter 11 solutions. Complete Class 5 Marathi Sulabhbharati Chapter 11 Notes.
Maharashtra Board Solutions for Class 5- Marathi Sulabhbharati: Chapter 11- इंधनबचत
Maharashtra Board 5th Marathi Sulabhbharati Chapter 11, Class 5 Marathi Sulabhbharati Chapter 11 solutions
Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
हा संवाद कोठे झाला?
उत्तरः
हा संवाद स्वयंपाकघरात झाला.
प्रश्न (आ)
संवादात किती पात्रे आहेत?
उत्तरः
या संवादात दोन पात्रे आहेत.
प्रश्न (इ)
दिनूला कशाचे महत्त्व पटले?
उत्तरः
दिनूच्या इंधन बचतीचे महत्त्व पटले.
2. खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.
प्रश्न 1.
खालील चित्रे पाहा त्याखालील वाक्ये वाचा. इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा.


उत्तर:
इंधन बचतीचे मार्गः
- पाणी तापवण्यासाठी सौरउर्जेचा वापर करा.
- बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करा.
- अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवा.
- जवळपास जायचे असल्यास व घाई नसल्यास कुठल्याही वाहनाने न जाता चालत जा.
- भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा.
- बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलिंडरचे बटण बंद करा.
3. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.
प्रश्न 1.
खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यांपैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वांत जास्त इंधनबचत होते ते घरी चर्चा करून सांगा.

उत्तर:
यांपैकी सौरपेटी व बायोगॅस संयंत्र वापरल्यास सर्वात जास्त इंधन बचत होते.
वाचू आणि हसू.

सनी: आई, बाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे.
आई: अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा!
सनी: अगं आई, तो मघाशीच माझ्याकडून फुटला ना!
Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा.
- इंधन म्हणजे काय?
- इंधनाशिवाय चालणारे दुचाकी वहान कोणते?
- पूर्वी आगगाडी कशावर चालत असे?
- पूर्वी लोकं जेवण कशावर बनवत असत?
- Solar Energy ला मराठीत काय म्हणतात?
उत्तरः
- जळण
- सायकल
- कोळशावर
- चुलीवर
- सौर उर्जा
1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1.
कोणाची आई आजारी होती?
उत्तरः
दिनूची आई आजारी होती.
प्रश्न 2.
दिनू आईसाठी काय बनवत होता?
उत्तरः
दिनू आईसाठी चहा बनवत होता.
प्रश्न 3.
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव काय होते?
उत्तरः
दिनूच्या वर्गमैत्रिणीचे नाव फातिमा होते.
प्रश्न 4.
फातिमाने कशासाठी नकार दिला?
उत्तरः
फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला.
प्रश्न 5.
योग्य गोष्टींसमोर (✓) अशी खूण व अयोग्य गोष्टींसमोर (✗) अशी खूण करा.
उत्तरः
- झाडे तोडणे [✗]
- सायकलवरून प्रवास करणे [✓]
- कारखान्यातील धूर हवेत सोडणे [✗]
- बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करणे [✓]
- पाणी तापवण्यासाठी बंबाचा उपयोग करणे [✓]
- अन्न शिजविण्यासाठी सौरचूल वापरू नये [✗]
प्रश्न 6.
खालील चित्रे पहा व योग्य जोड्या लावा.

उत्तरः
(1 – क) (2 – ड) (3 – ब) (4 – अ)
थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
फातिमाने दिनूला इंधनाची बचत कशी करायला सांगितली?
उत्तरः
एक कप चहासाठी जर मोठ्या पातेल्याऐवजी लहान पातेले घेतले तर पाणी लवकर उकळते आणि गॅसचीही बचत होते, चहाही लवकर होतो, असे म्हणून फातिमाने दिनूला इंधनाची बचत करायला सांगितली.
प्रश्न 2.
तुमची आई घरात इंधनाची बचत कशाप्रकारे करते ते लिहा.
उत्तरः
आई वरण भात करताना प्रेशर कुकरचा वापर करते. भाजी शिजवताना भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवते. उगाचच गॅस चालू ठेवत नाही. बाहेर जाताना व रात्री झोपताना गॅसच्या सिलेंडरचे बटण बंद करते.
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
- आई
- दार
- छोटं
- पाणी
- इंधन
- लक्ष
उत्तर:
- माता
- दरवाजा
- लहान
- जल
- सरपण
- ध्यान
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- आजारी
- उघड
- बिघाड
- छोटा
- लक्ष
उत्तर:
- निरोगी
- बंद
- दुरुस्ती
- मोठा
- दुर्लक्ष
प्रश्न 3.
वचन बदला.
- स्वयंपाकघर
- दार
- घर
- पातेली
उत्तर:
- स्वयंपाकघरे
- दारे
- घरे
- पातेल
प्रश्न 4.
लिंग बदला.
- आई
- वर्गमैत्रिण
- मुलगा
उत्तर:
- वडील
- वर्गमित्र
- मुलगी
पाठ्यपरिचय:
‘इंधन बचत’ या पाठात दिनूची वर्गमैत्रीण फातिमा त्याला इंधनबचतीचे महत्त्व व इंधनाची बचत कशाप्रकारे करायची ते समजावून सांगत आहे.
शब्दार्थ:
- इंधन – जळण (fuel)
- चहा – एक प्रकारचे पेय (tea)
- पातेले – लहान आकाराचे भांडे (a small utensil)
- आजारी – रुग्ण (sick)
- दार – दरवजा (door)
- वर्गमैत्रीण – वर्गातील मैत्रीण (a classmate)
- घर – सदन (home)
- उकळणे – कढवणे (to boil)
- समजणे – आकलन (to understand)
- लक्षात येणे – समजणे (to realise)
- ओतणे – (to pour)
- स्वयंपाकघर – स्वयंपाकाची खोली (kitchen)
Download PDF
Maharashtra Board Solutions for Class 5- Marathi Sulabhbharati: Chapter 11- इंधनबचत
Chapterwise Maharashtra Board Solutions Class 5 Marathi Sulabhbharati :
- Chapter 1- नाच रे मोरा
- Chapter 2- हत्तीचे चातुर्य
- Chapter 3- खेळूया शब्दांशी
- Chapter 4- हि पिसे कोणाची
- Chapter 5- डराव डराव
- Chapter 6- ऐकुया खेळूया
- Chapter 7- खेळत खेळत वाचुया
- Chapter 8- कोणापासून काय घ्यावे?
- Chapter 9- सिंह आणि बेडूक
- Chapter 10- बैलपोळा
- Chapter 11- इंधनबचत
- Chapter 12- बोलावे कसे?
- Chapter 13- अनुभव - १
- Chapter 14- चित्रसंदेश
- Chapter 15- नदीचे गाणे
- Chapter 16- मी नदी बोलते
- Chapter 17- आमची सहल
- Chapter 18- पैशांचे व्यवहार
- Chapter 19- अनुभव-२
- Chapter 20- गमतीदार पत्र
- Chapter 21- छोटेसे बहीणभाऊ
- Chapter 22- वाचूया लिहूया
- Chapter 23- प्रामाणिक इस्त्रीवाला
- Chapter 24- ऐका पहा करा
- Chapter 25- मालतीची चतुराई
- Chapter 26- पतंग
- Chapter 27- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- Chapter 28- फुलपाखरू आणि मधमाशी