Class 7: Marathi Sulabhbharati Chapter 7.2 solutions. Complete Class 7 Marathi Sulabhbharati Chapter 7.2 Notes.
Maharashtra Board Solutions for Class 7- Marathi Sulabhbharati: Chapter 7.2- आपली समस्या आपले उपाय
Maharashtra Board 7th Marathi Sulabhbharati Chapter 7.2, Class 7 Marathi Sulabhbharati Chapter 7.2 solutions
Questions and Answers
1. चित्र पाहा. संवाद वाचा.

- नीता : आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही.
- आजी : हो, नदीत जलपर्णी उगवली आहे.
- नीता : जलपर्णी म्हणजे काय गं आजी?
- आजी : पाण्यात उगवणारी वनस्पती.
- नीता : ती पाण्यात का उगवते?
- आजी : पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते.
- नीता : आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना!
- आजी : हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदूषणाची निदर्शक आहे.
- नीता : अरेरे! आजी, आता या जलपर्णीचं काय करायचं?
- आजी : पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची.
प्रश्न 1.
नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?
उत्तर:
शहाराच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे, कारखान्यातील दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.
प्रश्न 2.
नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील?
उत्तर:
नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून कारखान्यातील पाणी नदीत सोडू नये. तसेच शहरातील सांडपाणी’ नदीत सोडू नये.
प्रश्न 3.
जलपर्णी उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो?
उत्तर:
जलपर्णी उगवल्याने पाणी अशुद्ध होते.
प्रश्न 4.
नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते?
उत्तर:
नदीमध्ये जलपर्णी होऊ नये यासाठी दूषित पाणी नदीमध्ये सोडू नये.
प्रश्न 5.
नदीतले पाणी का दिसत नव्हते?
उत्तर:
नदीतल्या पाण्यात जलपर्णी उगवल्यामुळे नदीचे पाणी दिसत नव्हते.
प्रश्न 6.
जलपर्णी म्हणजे काय?
उत्तर:
जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणारी वनस्पती.
शब्दार्थ:
1. सांडपाणी – मैला (sewage)
Download PDF
Maharashtra Board Solutions for Class 7- Marathi Sulabhbharati: Chapter 7.2- आपली समस्या आपले उपाय
Chapterwise Maharashtra Board Solutions Class 7 Marathi Sulabhbharati :
- Chapter 1- प्रार्थना
- Chapter 2- श्यामचे बंधुप्रेम
- Chapter 3- माझ्या अंगणात
- Chapter 4- गोपाळचे शौर्य
- Chapter 5.1- दादास पत्र
- Chapter 5.2- आम्ही सूचनाफलक वाचतो
- Chapter 6- टप् टप् पडती
- Chapter 7.1- आजारी पडण्याचा प्रयोग
- Chapter 7.2- आपली समस्या आपले उपाय
- Chapter 8- शब्दांचे घर
- Chapter 9.1- वाचनाचे वेड
- Chapter 9.2- आम्ही बातमी वाचतो
- Chapter 10- पंडिता रमाबाई
- Chapter 11.1- लेक
- Chapter 11.2- आपली समस्या आपले उपाय
- Chapter 12- रोजनिशी
- Chapter 13- अदलाबदल
- Chapter 14- संतवाणी