Class 9: Marathi Kumarbharati Chapter 12 solutions. Complete Class 9 Marathi Kumarbharati Chapter 12 Notes.
Contents
Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 12- महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
Maharashtra Board 9th Marathi Kumarbharati Chapter 12, Class 9 Marathi Kumarbharati Chapter 12 solutions
Questions and Answers
1. वैशिष्टचे लिहा.
प्रश्न (अ)

उत्तर:

प्रश्न (आ)

उत्तर:

2. असत्य विधान ओळखा:
प्रश्न 1.
असत्य विधान ओळखा:
1. धुरंधर शिवरायांना स्मरावे.
2. असत्यास्तव शिंग फुकावे.
3. स्वातंत्र्याची आण घ्यावी.
4. जन्मभूमीचे उपकार फेडावे.
उत्तर:
2. असत्यास्तव शिंग फुकावे.
3. कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.
प्रश्न 1.
कवितेतून व्यक्त झालेली ‘महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता’ हा विचार स्पष्ट करा.
उत्तर:
महाराष्ट्र हे मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात यशाची ज्योत पाजळते. महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे नि वर निळ्या आकाशाची छाया आहे. गडकिल्ले महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात.
रथीमहारथींनी तिला भूषवले आहे. अरबी समुद्र जिच्या चरणांशी लीन आहे. महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा, साधुसंतांचा, शाहिरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे. या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जान कुर्बान करायला मी तयार आहे. अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे.
4. महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत लिहा.
प्रश्न 1.
महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
या महाराष्ट्ररूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे. नील अंबराच्या छायेखाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे. हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गडकिल्ले गातात. महारथी, शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे. ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची, कष्टकऱ्यांची, संतमहंत व शाहिरांची आहे. येथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे. अरबी समुद्र महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी लीन आहे. स्वातंत्र्याचे रणशिंग फुकून महाराष्ट्राची मान ताठ ठेवणाऱ्या श्रीछत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्ज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.
5. काव्यसौंदर्य.
प्रश्न (अ)
‘धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य लिहा.
उत्तर:
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, तेव्हा त्याला काहीजणांनी विरोध दर्शवला. खूप साधकबाधक चर्चा झाली. परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता. निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती. त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये; म्हणून शाहीर म्हणतात, की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या. अशीच अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे. ती पूर्ण करण्यास कटिबद्ध होऊ या.
प्रश्न (आ)
कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दांत सोदाहरण वर्णन करा.
उत्तर:
या कवितेत जागोजागी वीररसाची प्रचीती येते. मराठी मन आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी वीररसाचा मुक्त वापर केला आहे. ‘कंबर बांधून ऊठ घाव झेलाया। महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया’ या पहिल्या दोन ओळींत शाहिरांनी मर्दमराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे. ‘करी कंकण बांधून साचे,’ ‘सत्यास्तव शिंग फुकाया,’ ‘पर्वत उलथून यत्नाचे,’ ‘धर ध्वजा करी ऐक्याची,’ ‘पाऊले टाक हिंमतीची,’ ‘घे आण स्वातंत्र्याची’ अशा प्रकारच्या ओळींमधून ओजगुण ओतप्रोत भरला आहे. मराठी मन पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीररसाने ओतप्रोत भरली आहे.
6. अभिव्यक्ती.
प्रश्न (अ)
तुम्हांला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.
उत्तर:
महाराष्ट्र हा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे. संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्रभूमी आहे. इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा इत्यादी नदयांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे. येथे शौर्य व वैराग्य है हातात हात घालून नांदतात. विदयेचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला.
भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली. औदयोगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेरघर आहे. सत्य, शिव, सुंदर या मूल्यत्रयींची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे.
भाषाभ्यास:
वृत्तांतील लघुगुरूक्रम ठरवण्याचे काही नियम आहेत.
1. ‘पुस्तक’ या शब्दांतील लघुक्रम (-∪∪) असा आहे, कारण ‘पु’ हे अक्षर लघू असले, तरी पुढच्या ‘स्त’ या जोडाक्षराचा आघात मागील लघु स्वरावर येतो. त्यामुळे त्याच्या 2 मात्रा धराव्या लागतात. जर असा आघात येत नसेल, तर जे अक्षर म्हस्व आहे ते न्हस्वच राहते.
2. जोडाक्षरातील शेवटचा वर्णन्हस्व असेल, तर ते जोडाक्षर व्हस्व मानावे.
उदा., भास्कर (-∪∪) दीर्घ असेल, तर दीर्घ उदा., इच्छा (-∪∪).
3. लघु अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा त्यानंतर विसर्ग येत असेल तर ते गुरू मानावे.
उदा., नंतर (-∪∪) दुःखी (-∪∪).
4. कवितेच्या चरणातील शेवटचे अक्षर लघू असले तरी दीर्घ उच्चारले जाते. त्यामुळे ते गुरू किंवा दोन मात्रांचे मानतात.
मराठी पदयरचनेत अक्षरवृत्ते, छंदवृत्ते, मात्रावृत्ते किंवा जातिवृत्ते असे तीन प्रकार आढळतात.
अक्षरवृत्ते | छंदवृत्ते | मात्रावृत्ते |
प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी, लघुगुरूक्रमसुद्धा सारखा असतो. | चरणातील अक्षरांची संख्या समान असते; पण लघुगरूक्रम नसतो. | अक्षरांची संख्या सारखी, नसते; पण मात्रांची संख्या मात्र सारखी असते. |
Additional Important Questions and Answers
1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.

उत्तर:

कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. हातात ……………….. ध्वजा धर.
(सामंजस्याची/वीरांची/एकजुटीची/ धुरंधराची)
2. मैदानात शिंग ……………. साठी फुकायचे आहे.
(हत्या /सत्या /विदया / असत्या)
3. महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची ……………… घे.
(शपथ / तलवार/कंकण / स्वप्ने)
उत्तर:
1. हातात एकजुटीची ध्वजा धर.
2. मैदानात शिंग सत्यासाठी फुकायचे आहे.
3. महाराष्ट्रासाठी लढण्याची स्वातंत्र्याची शपथ घे.
प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
- शिवरायांना म्हटले आहे – [ ]
- पर्व आले आहे – [ ]
- शेतकऱ्यांची दोन अवजारे – [ ] व [ ]
- पर्वत उलथायचे आहेत – [ ]
- तलवार आहे ती – [ ]
उत्तर:
- धुरंधर
- संयुक्त महाराष्ट्राचे
- खुरपे व दोरी
- प्रयत्नांचे
- त्यागाची
कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)
प्रश्न 1.
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
उत्तर:
महाराष्ट्राची महती गाताना शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात – या महाराष्ट्राच्या चरणांना अरबी समुद्र वंदन करतो. त्या प्रिय महाराष्ट्रावर स्वत:चा जीव ओवाळून टाक. समर्पित हो.
1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
प्रश्न 1.
कविता-महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया.
उत्तर:
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
2. कवितेचा विषय → या महाराष्ट्र गौरवगीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव यांची ओजस्वी शब्दांत ओळख करून दिली आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →
- काया = शरीर
- धरा = धरणी
- अंबर = आकाश
- साचे = खरे
- मनीषा = इच्छा
- आण = शपथ.
4. कवितेतून मिळणारा संदेश → शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्रभूमीला वंदन करणे व तिचे पांग फेडणे, हे कर्तव्य आहे, असा संदेश या कवितेत दिला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी, ही शिकवण दिली आहे.
5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. ‘या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया’ अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. ‘महाराष्ट्रास्तव लढण्याचे’ आवाहन काळजाला भिडते.
6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → कर्तृत्ववान इतिहासाची आठवण ठेवून एकजुटीने महाराष्ट्रभूमीचे पांग फेडण्यासाठी जीव कुर्बान करावा हा विचार मांडला आहे.
7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
महाराष्ट्र मंदिरापुढती। पाजळे याशीची ज्योती ।।
सुवर्णधरा खालती। निल अंबर भरले वरती ।।
→ महाराष्ट्रभूमीचा गौरव करताना शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात की, महाराष्ट्र हे पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी बलिदान केलेल्या प्राणांची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची अशी धरती आहे की त्या धरतीवर निळ्या आकाशाचे छत आहे.
8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → महाराष्ट्राचा बलशाली इतिहास, पवित्र भूमी, श्रीशिवरायांची धुरंधर राजनीती, कर्तव्याची जाण, भविष्याची ग्वाही अशी टप्प्याटप्याने उलगडणारी ही कविता आस्वादताना अंगात वीरश्री संचारते. तसेच उपकाराला स्मरून जीव ओवाळून टाकावा, अशी महाराष्ट्रभूमीचे नितांत सुंदर वर्णन असलेली व तेजस्वी शब्दांत आवाहक भावना रुजवणारी ही कविता मला आवडली.
कृतिपत्रिकेतील प्रश्न 2 (इ) साठी…
1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:
प्रश्न 1.
‘महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती
सुवर्णधरा खालती । निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी’
उत्तर:
आशयसौंदर्य: महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे. तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आवाहन शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी या कवितेत ओजस्वी शब्दांत केले आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण व मराठी मनाची दृढ एकजूट . हा आशय प्रत्ययकारी शब्दांत मांडला आहे.
काव्यसौंदर्य: संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करताना म्हणतात – महाराष्ट्रभूमी एक पवित्र मंदिर आहे. या मंदिरापुढे वीरपुरुषांनी आहुती दिलेल्या यज्ञाची ज्योत जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाचे छत धरले आहे. म्हणजे ही नररत्नांची खाण आहे व त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे (स्तुतिगीते) गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचे गौरवगीत ओजस्वी शब्दकळेत साकार केले आहे. बाहू स्फुरण पावतील, अशी आवाहनात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणली आहे. ‘या सत्यास्तव मैदानि शिंग फुकाया’ अशा सुभाषितप्रचुर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीरश्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचे दर्शन होते. ‘महाराष्ट्रास्तव लढण्याचे’ आवाहन काळजाला भिडते.
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
• वाक्प्रचार / म्हणी:
प्रश्न 1.
पुढील म्हणी पूर्ण करा:
1. थेंबे थेंबे ………………..
2. …………… झोपा केला.
उत्तर:
1. थेंबे थेंबे तळे साचे.
2. बैल गेला नि झोपा केला.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:
- अंबर
- ध्वज
- मंदिर
- तलवार.
उत्तर:
- अंबर = आकाश
- ध्वज = झेंडा
- मंदिर = देऊळ
- तलवार = समशेर.
प्रश्न 2.
शब्दांत लपलेले चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. महाराष्ट्र
2. शासनकर्ता.
उत्तर:
1. महाराष्ट्र – महा, हारा, राष्ट्र, राम.
2. शासनकर्ता – शान, सन, कर्ता, नस.
2. लेखननियम:
प्रश्न 1.
अचूक शब्द निवडा:
1. संयूक्त, सयुंक्त, संयुक्त, संयुत्क.
2. जन्मभूमि, जम्नभूमी, जन्मभूमी, जन्मभुमी.
उत्तर:
1. संयुक्त
2. जन्मभूमी.
3. पारिभाषिक शब्द:
प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द दया:
- Bio-data
- Event
- Registered Letter
- Dismiss.
उत्तर:
- स्व-परिचय
- घटना
- नोंदणीकृत पत्र
- बडतर्फ.
कवितेचा आशय:
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णा भाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारे हे गीत (कवन) लिहिले. त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केला आहे.
शब्दार्थ:
- काया – शरीर.
- घाव – प्रहार.
- मंदिर – देऊळ.
- पुढती – पुढे.
- पाजळे – जळते, तेवते.
- याशीची – यशाची किंवा यज्ञाची.
- सुवर्ण – सोने.
- धरा – धरणी, धरती, जमीन.
- निल – निळे.
- अंबर – आकाश.
- गड – किल्ले.
- भूषवी – भूषवतात, मढवतात, सजवतात.
- महारथी – थोर देशभक्त.
- सागर – समुद्र.
- जयाचे – ज्याच्या.
- पाया – पायाला, चरणांना.
- मायभूमि – मातृभूमी.
- धीरांची – शूर धैर्यवंतांची.
- शासनकर्ते – राज्यकर्ते.
- श्रमाची – कष्टाची.
- त्याग – नि:स्वार्थीपणे सर्व सोडून देणे.
- स्मरून – आठवण करून.
- धुरंधर – कुशल, तरबेज, प्रमुख.
- पातले – आले.
- कंकण – कडे, बांगडी.
- साचे – खरे.
- पर्वत – मोठे डोंगर.
- उलथून – उचलून टाकणे.
- यत्न – प्रयत्न.
- सांधू – जोडू.
- खंड – तुकडे.
- सत्यास्तव – खरेपणासाठी.
- ध्वजा – झेंड्याला.
- करी – हातात.
- ऐक्याची – एकजुटीची.
- मनीषा – इच्छा.
- हिंमत – धैर्य, जिद्द.
- कणखर – मजबूत.
- पोलाद – लोखंड.
- आण – शपथ.
- जाया – जाण्यासाठी.
टिपा:
- पोवाडा – वीररसयुक्त शाहिरी कवन (काव्य).
- अरबी सागर – भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या समुद्राचे नाव.
- खुरपे – तण उपटण्यासाठीचे शेतकऱ्यांचे अवजार.
- दोरी – (1) पेरणी-लावणीच्या वेळी शेतकरी कमरेला दोरी बांधतात. (2) मोटेचे पाणी काढण्यासाठी मोटेला बांधलेला दोरखंड.
- शाहीर – वीररसयुक्त पोवाडे व शृंगाररसात्मक लावणी लिहिणारे व सादर करणारे कवी – गायक.
- पर्व – विशिष्ट कालखंड.
- संयुक्त महाराष्ट्र – मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी मराठी माणसांनी घडवलेली चळवळ.
- शिंग – रानरेड्याच्या (गवा) शिंगापासून बनवलेले वायुवादय – रणशिंग (तुतारी).
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
- काया ओवाळून टाकणे – जीव कुर्बान करणे.
- स्वप्न साकार करणे – स्वप्न प्रत्यक्षात आणणे, मनात असलेले कार्य तडीस नेणे.
- कंबर बांधणे (कसणे) – दृढ निश्चय करणे.
- करी कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे.
- शिंग फुकणे – लढा देण्यास सुरुवात करणे.
- आण घेणे – शपथ घेणे.
- उपकार फेडणे – कृतज्ञतेने उपकारांची परतफेड करणे.
कवितेचा भावार्थ:
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर म्हणतात –
कंबर कसून तयार हो, दृढ निश्चय करून घाव झेलायला ऊठ. या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर. ।।
या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यज्ञाची (यशाची) ज्योत जळत आहे. सोन्याची (नररत्नांची खाण व कसदार) धरणी खाली नि वर निळे आकाश भरले आहे. सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रथीमहारथी देशभक्तांनी सजवले आहे. या महाराष्ट्रभूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे, त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण
ओवाळून टाक.।।
ही माझी मातृभूमी धैर्यवंतांची आहे. वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे. ही संतांची, शाहिरांची भूमी आहे. इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे. ज्या भूमीवर श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे.।।
संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून (घोर प्रतिज्ञा करून) खरोखर सज्ज झालो आहोत. प्रयत्नांचे पर्वत उलथून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध, अखंड राखूया. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुकले आहे. या महाराष्ट्रावर कुरवंडी ओवाळून टाकू.।।
महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे. हिमतीने, जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले टाक. महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे. या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो. या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक. बलिदान दे.
Download PDF
Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 3): Chapter 12- महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
Chapterwise Maharashtra Board Solutions Class 9 Marathi Kumarbharati :
Part- 1
- Chapter 1- वंद्य ‘वन्दे मातरम्’
- Chapter 2- संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
- Chapter 2.2- संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
- Chapter 3- कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
- Chapter 4- नात्यांची घट्ट वीण
- Chapter 5- एक होती समई
- Chapter 5.1- हास्यचित्रांतली मुलं
Part- 2
- Chapter 6- या झोपडीत माझ्या
- Chapter 7- दुपार
- Chapter 8- अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या
- Chapter 9- मी वाचवतोय
- Chapter 10- यंत्रांनी केलं बंड
- Chapter 10.1- इंग्लंडचा हिवाळा
Part- 3
- Chapter 11- मातीची सावली
- Chapter 12- महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
- Chapter 13- थोडं ‘आ’ भारनियमन करूया
- Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर
- Chapter 15- निरोप
- Chapter 15.1- ‘बिग 5’ च्या सहवासात
Part- 4
- Chapter 16- वनवासी
- Chapter 17- ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
- Chapter 18- हसरे दुःख
- Chapter 19- प्रीतम
- Chapter 20- आपुले जगणे…आपुली ओळख!
- Chapter 20.1- विश्वकोश
FAQs
You can download the Maharashtra State Board Books from the eBalbharti official website, i.e. cart.ebalbharati.in or from this article.
Students can get the Maharashtra Books for primary, secondary, and senior secondary classes from here. You can view or download the Maharashtra State Board Books from this page or from the official website for free of cost. Students can follow the detailed steps below to visit the official website and download the e-books for all subjects or a specific subject in different mediums.
Step 1: Visit the official website ebalbharati.in
Step 2: On the top of the screen, select “Download PDF textbooks”
Step 3: From the “Classes” section, select your class.
Step 4: From “Medium”, select the medium suitable to you.
Step 5: All Maharashtra board books for your class will now be displayed on the right side.
Step 6: Click on the “Download” option to download the PDF book.
As of now, the MSCERT and Balbharti are responsible for the syllabus and textbooks of Classes 1 to 8, while Classes 9 and 10 are under the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE).
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, conducts the HSC and SSC Examinations in the state of Maharashtra through its nine Divisional Boards located at Pune, Mumbai, Aurangabad, Nasik, Kolhapur, Amravati, Latur, Nagpur and Ratnagiri.
About Maharashtra State Board (MSBSHSE)
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education or MSBSHSE (Marathi: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ), is an autonomous and statutory body established in 1965. The board was amended in the year 1977 under the provisions of the Maharashtra Act No. 41 of 1965.
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE), Pune is an independent body of the Maharashtra Government. There are more than 1.4 million students that appear in the examination every year. The Maha State Board conducts the board examination twice a year. This board conducts the examination for SSC and HSC.
The Maharashtra government established the Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research, also commonly referred to as Ebalbharati, in 1967 to take up the responsibility of providing quality textbooks to students from all classes studying under the Maharashtra State Board. MSBHSE prepares and updates the curriculum to provide holistic development for students. It is designed to tackle the difficulty in understanding the concepts with simple language with simple illustrations. Every year around 10 lakh students are enrolled in schools that are affiliated with the Maharashtra State Board.