Class 9: Marathi Kumarbharati Chapter 5 solutions. Complete Class 9 Marathi Kumarbharati Chapter 5 Notes.
Contents
Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 1): Chapter 5- एक होती समई
Maharashtra Board 9th Marathi Kumarbharati Chapter 5, Class 9 Marathi Kumarbharati Chapter 5 solutions
Questions and Answers
1. चौकटी पूर्ण करा:
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(अ) कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख – [ ]
(आ) रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था – [ ]
(इ) आयुष्याचा पाया भक्कम करणारे – [ ]
(ई) भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे – [ ]
उत्तर:
(अ)अनुताई वाघ
(आ) बाल ग्रामशिक्षण केंद्र
(इ) प्राथमिक शिक्षण
(ई) आदिवासी बालक
2. खालील घटनांचे परिणाम लिहा:
प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा:

उत्तर:
घटना | परिणाम |
(अ) अनुताईंचे निधन. | कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. |
(आ) ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | डोंगराएवढे दुःख त्यांनी फेकून दिले आणि जिद्दीने उभ्या राहिल्या. |
(इ) ताराबाईंचे निधन. | अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. |
3. कार्यक्षेत्र लिहा:
प्रश्न 1.
कार्यक्षेत्र लिहा:

उत्तर:

4. का ते लिहा:
प्रश्न (अ)
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
उत्तर:
शिक्षण सर्वांगीण असले पाहिजे. ते एकांगी असता कामा नये. तसेच, केवळ चाकोरीबद्ध रितीने न शिकवता अनेक प्रयोग केले पाहिजेत, असा दृष्टिकोन बाळगून अनुताईंनी कार्य केले. त्यांच्या या कार्याविषयी अनेकांना कुतूहल होते. म्हणून शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचे सातत्याने आकर्षण राहिले.
प्रश्न (आ)
अनुताईंच्या कार्याचा तुम्हांला जाणवलेला विशेष सांगा.
उत्तर:
आपल्याकडे शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षण असा समज घट्ट बसला आहे. खरे तर शिक्षण जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुख असले पाहिजे. ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे. समाजात पूरक वातावरण तयार असले पाहिजे.
अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे. कुटुंबकल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छता व आरोग्य यांबाबत समाजात जागृती हवी. तसेच, लहान मुले, मूकबधिर व महिला या घटकांना सक्षम केले पाहिजे. इतके व्यापक भान अनुताईंना होते. म्हणून त्यांनी शालेय , शिक्षणाबरोबर अन्य सामाजिक क्षेत्रांकडे लक्ष दिले आणि तेथेही भरीव । काम केले. अनुताईंच्या कार्याचा हा फार मोठा विशेष आहे.
5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा:
प्रश्न 1.
खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा:
1. भातुकलीचा खेळ
2. ज्ञानयज्ञ
3. ज्ञानगंगा.
4. पाऊलखुणा.
उत्तर:
1. भातुकलीचा खेळ: लहान मुलांचा, विशेषतः मुलींचा खेळ. यात खोटा खोटा संसार उभारला जातो. संसारोपयोगी चिमुकली भांडी आणली जातात. प्रत्यक्ष संसारात मोठी माणसे जशी वावरतात, त्याचे अनुकरण करीत खेळ मांडला जातो. बाहुला-बाहुलीचे लग्नही लावले जाते. थोडक्यात, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा, आभासमय असा संसार.
2. ज्ञानयज्ञ: विधिपूर्वक अग्नी पेटवला जातो आणि त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अग्नी ती आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो, अशी श्रद्धा आहे. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले. त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले. यज्ञात आहुती देतात, तशी अनुताईंनी स्वत:च्या जीवनाची आहुती दिली. म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय.
3. ज्ञानगंगा: गंगा नदी पवित्र मानली जाते. गंगेचे पाणी प्याल्यास पुण्य मिळते, पाप नाहीसे होते अशी श्रद्धा आहे. गंगा नदी घरोघर पोहोचवणे म्हणजे सर्वांचे दु:ख, दैन्य दूर करणे असा अर्थ रूढ झाला आहे. अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षण नेले. एक प्रकारे त्यांचे जीवन अनुताईंनी पवित्र केले, म्हणून त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे.
4. पाऊलखुणा: या शब्दाचा शब्दश: अर्थ, चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. त्या खुणांवरून, कोण चालत गेले, हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय, काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे, त्यांच्या ‘पाऊलखुणा’ आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत.
6. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा:
प्रश्न 1.
खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा:
(अ) व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - [ ]
(आ) नेमाने स्वत:ला बांधणारा - [ ]
(इ) गावातील रहिवासी - [ ]
(ई) तिहाइताच्या भूमिकेतून बघणारा - [ ]
उत्तर:
(अ) व्रतस्थ
(आ) नेमस्त
(इ) ग्रामस्थ
(ई) भतटस्थ
7. खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा :
प्रश्न 1.
खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा :
उदा., 1. सापेक्ष × निरपेक्ष, 2. अनावृष्टी × अतिवृष्टी.
- अनाथ
- दुश्चिन्ह
- सुपीक
- एकमत
- पुरोगामी
- स्वदेशी
- विजातीय
उत्तर:
- अनाथ × सनाथ
- दुश्चिन्ह × सुचिन्ह
- सुपीक × नापीक
- एकमत × दुमत
- पुरोगामी × प्रतिगामी
- स्वदेशी × परदेशी
- विजातीय × सजातीय
8. स्वमत:
प्रश्न (अ)
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
समईचा प्रकाश मंद, शांत, स्निग्ध असतो. तिच्या प्रकाशात शांत, निवांत वाटते. ती गाभारा उजळून टाकते. त्या शांत प्रकाशात बसावे आणि देवाचे नाव घ्यावे अशी इच्छा होते. तिचा प्रकाश भगभगीत नसतो. भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळतच नाही. अनुताई वाघांचे व्यक्तिमत्त्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता. भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून, त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईंच्या सहवासात असताना मायेची ऊब मिळे. अनुताईंचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. अनुताईंना दिलेली समईची उपमा यथार्थ आहे.
प्रश्न (आ)
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
समई देवाजवळच लावली जाते. घरात प्रकाश मिळावा, म्हणून अन्य दिवे वापरतात; समई नव्हे. देवाजवळची, गाभाऱ्यातली समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्येच सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण घर, संपूर्ण महाल किंवा संपूर्ण परिसर उजळून टाकण्याची ईर्षा बाळगत नाही. ती फक्त देवघर किंवा मंदिरातला गाभारा उजळते. पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश पसरवीत नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत, निवांत करणारा असतो. मर्यादित प्रमाणात राहावे, ही तिची वृत्तीच जणू असते. म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च, उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे
उपक्रम:
प्रश्न 1.
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.
भाषाभ्यास:
उपमेय व उपमान यांच्यातील साधर्म्यावर आधारित काही अलंकारांचा आपण अभ्यास केला. आता इतर काही अलंकार पाहूया.
1. दृष्टान्त अलंकार:
खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.
उदा., चंदनाचे हात । पायही चंदन
तुका म्हणे तैसा । सज्जनापासून
पाहता अवगुण । मिळेचिना (संत तुकाराम)
1. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
[ ] आणि [ ]
2. (अ) चंदनाचा विशेष गुण – [ ]
(आ) संतांचा विशेष गुण – [ ]
चंदन सर्वांगाने सुगंधित-त्रिकालाबाधित सत्य
सज्जन व्यक्ती अंतर्बाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण दिले आहे.
3. दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये –
1. एखादी गोष्ट पटवून देणे.
2. ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे.
4. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते, तेव्हा ‘दृष्टान्त’ अलंकार होतो.
प्रश्न 1.
खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा.
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।
- संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात – [ ]
- रत्नासारख्या थोर ऐरावताला सहन करावा लागतो – [ ]
- मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते – [ ]
- संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात – [ ]
- मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात – [ ]
उत्तर:
- [लहानपण दे]
- [अंकुशाचा मार]
- [साखरेचा रवा]
- [नम्रपणा असावा]
- [थोर ऐरावताला अंकुशाचा मार]
Additional Important Questions and Answers
उतारा क्र. 1
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
- बालपणीच वैधव्य आलेल्या – [ ]
- अनुताईंचे अश्रू पुसणाऱ्या – [ ]
- प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या – [ ]
- ताराबाईंनी स्थापन केलेली संस्था – [ ]
उत्तर:
- अनुताई वाघ
- ताराबाई मोडक
- अनुताई वाघ
- बाल ग्रामशिक्षण केंद्र
प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
- वादळ झेलतात – ………………………………..
- वादळ पचवतात – ………………………………….
- ज्ञानयज्ञ तेवत ठेवला – …………………………………..
- कोसबाडची टेकडी हळहळली – …………………………..
उत्तर:
- मोठ्या संकटांना सामोरे जातात.
- संकटांचे निवारण करतात.
- ज्ञानप्रसाराचे कार्य दीर्घकाळ चालू ठेवले.
- कोसबाडच्या टेकडीवरील आदिवासी हळहळले, ते व्यथित झाले.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
हा उतारा वाचल्यावर अनुताई वाघांची तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
अनुताई वाघांचा काळ म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वीचा काळ. त्या काळाला धरून अनुताईंचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे इयत्ता आठवीत असण्याच्या वयात झाले. शाळेत मित्रमैत्रिणींबरोबर शिकण्याचे व खेळण्याबागडण्याचे हे वय. पण त्यांना हा नैसर्गिक उत्सव सोडून लग्न करावे लागले. पण लग्न, संसार म्हणजे काय, हे कळण्याच्या आतच, म्हणजे सहा महिन्यांतच, त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या विधवा झाल्या. त्या काळात विधवांचे जीवन खूप कष्टाचे, हलाखीचे व अपमानाचे होते. पण त्या वयातही त्या मनाने खंबीर राहिल्या. स्वत:ला खचू दिले नाही.
संकटांना तोंड देण्यासाठी स्वतः शक्तिमान असणे आवश्यक असते, हे त्यांनी ओळखले. स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिक बलशाली करण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेतले. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी संपादन केली. त्या स्वत:चे दुःख कुरवाळत बसल्या नाहीत किंवा संकटांना शरणही गेल्या नाहीत. दुःखाला सामोरे जाण्याचा त्यांनी वेगळाच मार्ग निवडला. त्या ताराबाई मोडकांच्या कार्यात सामील झाल्या. त्यांनी आदिवासी बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे ठरवले. त्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले. यावरून त्यांच्या मनातील उच्च, उदात्त मूल्यांचे दर्शन घडते.
उतारा क्र. 2
पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:

उत्तर:

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा:
1. कपाळावर दारिद्र्याचा शाप असलेली – [ ]
2. प्रसिद्धीचा हव्यास नसलेल्या – [ ]
उत्तर:
1. आदिवासी बालके
2. अनुताई वाघ
प्रश्न 3.

उत्तर:

कृती 2: (आकलन)
प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा:
आदिवासींची स्थिती | अनुताईंचे कर्तृत्व |
उत्तर:
आदिवासींची स्थिती | अनुताईंचे कर्तृत्व |
पराकोटीचे दारिद्र्य | मायेची ऊब दिली व ज्ञानाची ज्योत पेटवली |
प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा:

उत्तर:

कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्हांला या उताऱ्यावरून जाणवलेले उपाय लिहा.
उत्तर:
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना प्रथम गरज असते ती मायेची. मायेच्या आधाराने त्यांच्यात ज्ञानाची ओढ निर्माण केली __ पाहिजे. अशा स्थितीत नेहमीचे चाकोरीबद्ध शिक्षक उपयोगाचे नाहीत. त्यांना शिकवण्याबरोबर मार्गदर्शन केले पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच, सतत नवनवीन प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांकडे दूरदृष्टी असली पाहिजे. प्रथम प्राथमिक शिक्षण भक्कम केले पाहिजे. या शिक्षकांनी प्रसिद्धीपासून दूर राहिले पाहिजे. या सर्व बाबी पाळल्या तर दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकांना चांगले शिक्षण देता येईल.
उतारा क्र. 3:
1. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
का ते लिहा:
अन्य क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे काम केले आहे.
उत्तर:
आपल्या शाळांमधून दिले जाणारे औपचारिक शिक्षण एकांगी आहे. या शिक्षणाने एक चांगला नागरिक घडवता येणे अशक्य आहे. म्हणून शिक्षणाशी संबंधित क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठे कार्य केले.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
कल्पना स्पष्ट करा:
1. अंधश्रद्धा निर्मूलन
2. महिला विकास.
उत्तर:
1. अंधश्रद्धा निर्मूलन : अंधश्रद्धेमुळे माणसे चुकीच्या मार्गांनी जातात. स्वत:ची विचारशक्ती, विवेकबुद्धी गमावून बसतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत. यांमुळे माणसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत नुकसान, अपयश मिळत राहिल्याने ती हतबल होतात आणि पुन्हा अंधश्रद्धांच्या मागे लागतात. या परिस्थितीचा लबाड लोक गैरफायदा घेतात. ते दुबळ्या माणसांना लुबाडतात, म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणारी चळवळ, म्हणजे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ होय.
2. महिला विकास : शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्याची नितांत गरज असते. त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजेत. महिला कमावत्या असतील, तर त्यांना आत्मविश्वास येतो. त्या शिक्षित असतील, तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते. दृष्टी व्यापक बनते. मग घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार होते. महिलांना उपजीविकेची साधने मिळवून देणे, शिकू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देणे, विविध कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजवणे, स्त्रीपुरुष समानतेचा दृष्टिकोन रुजवणे या गोष्टी प्राधान्याने महिला विकासात येतात.
प्रश्न 2.
आशय स्पष्ट करा:
अनेक मानसन्मान अनुताईंच्या शोधात भटकत राहिले.
उत्तर:
वेगवेगळ्या कर्तबगारी गाजवलेल्यांना शासन व समाज सन्मान देऊन त्यांचा गौरव करतात. कित्येकजण हे सन्मान मिळावेत म्हणून गैरमार्गाने प्रयत्न करतात. अनुताईंना मात्र कार्य करण्यातच रस होता, त्यांचे कार्यच एवढे उत्तुंग होते की, त्यांचा सन्मान करावा, असे सर्वांनाच वाटत होते. म्हणून अनुताईंनी न मागता अनेक सन्मान त्यांना मिळत गेले.
उतारा क्र. 4:
पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती 1 : (आकलन)
प्रश्न 1.
का ते लिहा:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
उत्तर:
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे रूढी, परंपरा, अज्ञान व अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. प्रचंड अज्ञानामुळे लोकांना स्वतंत्र बुद्धीने विचार करता येत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासलेले असतात. त्यांना नवीन सुधारणा नको असतात. सुधारणांमुळे आपले नुकसान होईल, अशी त्यांना भीती वाटते. म्हणून ते शिक्षणाला विरोध करतात.
कृती 2 : (आकलन)
प्रश्न 1.
पुढील बाबींची घातकता सांगा:
1. रूढी
2. परंपरा
3. अंधश्रद्धा
4. स्थितिशीलता.
उत्तर:
1. रूढी: रूढींमुळे माणसे विचार करीत नाहीत, चिकित्सा करीत नाहीत. घातक प्रथा तशाच राहतात.
2. परंपरा: पूर्वापार चालत आलेली जगण्याची रीत म्हणजे परंपरा. परंपराप्रिय माणसे नवीन गोष्टींना, सुधारणांना विरोध करतात.
3. अंधश्रद्धा: भूताखेतांच्या, देवधर्माच्या खूप जुन्या कल्पनांवर श्रद्धा ठेवणे म्हणजे ‘अंधश्रद्धा’. अंधश्रद्धाळू माणसे विज्ञाननिष्ठेकडे पाठ फिरवतात. अंधश्रद्धेतून चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे खूप नुकसान होते. कधी कधी माणसांचे प्राणही जातात. अंधश्रद्धेमुळे प्रगतीच्या मार्गात अडचणी निर्माण होतात.
4. स्थितिशीलता: आहे त्याच स्थितीला चिकटून राहणे आणि त्याच स्थितीत राहण्यात आनंद मानणे, म्हणजे ‘स्थितिशीलता’. या वृत्तीमुळे प्रगती, विकास होत नाही. किंबहुना प्रगतीला विरोध केला जातो.
प्रश्न 2.
अर्थ स्पष्ट करा:
1. ज्ञानाचा दिवा जपणे.
2. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे.
उत्तर:
1. ज्ञानाचा दिवा जपणे: दिव्यामुळे प्रकाश पडतो. अंधार दूर होतो. आपल्याला स्पष्टपणे सर्व दिसते. ज्ञानामुळेही सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सर्व घटना, प्रसंग, माणसे, माणसांचे वागणे आपल्याला कळते. म्हणून ज्ञानाला दिवा म्हणतात. ज्ञानाचा दिवा जपणे म्हणजे ज्ञान वाढवत राहणे.
2. मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करणे: मनात अज्ञानामुळे अंधार निर्माण होतो. कधी कधी अंधश्रद्धेने सत्य काय व असत्य काय हे कळत नाही. रूढींमुळेही हा गोंधळ उडतोच. भूताखेतांवर विश्वास ठेवल्यामुळेही मनात भीती निर्माण होते. हे सर्व अंधाराचेच प्रकार होत. या अंधारामुळे माणूस योग्य दिशेने प्रगती करू शकत नाही. ज्ञानामुळे हे सर्व अंधार नष्ट होतात. माणूस प्रगती करू शकतो.
कृती 3 : (स्वमत/अभिव्यक्ती)
प्रश्न 1.
अनुताईंच्या मार्गातील खडतरपणा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
आदिवासींमध्ये कमालीचे दारिद्र्य असल्यामुळे कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. वर्ग घेण्यासाठी साधी जागा मिळत नसे. बसण्याच्या सोयी, खडू-फळा या गोष्टीही मिळत नसत. अनुताईंनी या स्थितीलाही खंबीरपणे तोंड दिले. जेथे मिळेल तेथे वर्ग घेतले. प्रसंगी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी झोपडीत, तर कधी उघड्याबोडक्या माळावर वर्ग घेतले.
सर्व भौतिक सोयींची वानवा होतीच. पण आदिवासींची मानसिकताही शिक्षणाला पूरक नव्हती. पोट भरण्यासाठी भटकावे लागत असल्याने मुलांना शिक्षणासाठी मोकळे ठेवणे त्यांना परवडत नसे. शिवाय, अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी-परंपरा यांच्या प्रभावामुळेही आदिवासी लोक शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत. त्यांना पुन:पुन्हा समजावून सांगून शिक्षणाकडे आणावे लागे. यात अनुताईंची बरीचशी शक्ती खर्च होई.
भाषाभ्यास:
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
1. अलंकार:
प्रश्न 1.
पुढील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा:
1. चंदनाचे हात। पायही चंदन।
तुका म्हणे तैसा। सज्जनापासून।
पाहता अवगुण। मिळेचिना।। (संत तुकाराम)
2. संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात?
[ ] आणि [ ]
2. (अ) चंदनाचा विशेष गुण – [ ]
(आ) संतांचा विशेष गुण – [ ]
उत्तर:
1. [सज्जन] आणि [चंदन]
2. (अ) [सुगंधित]
(आ) [त्यांच्यात अवगुण नसतो]
2. समास:
प्रश्न 1.
तक्ता भरा: (उत्तरे अधोरेखित केली आहेत.)
उत्तर:
सामासिक शब्द | विग्रह |
1. भेदाभेद | भेद किंवा अभेद |
2. गप्पागोष्टी | गप्पा, गोष्टी वगैरे |
3. मीठभाकर | मीठ, भाकर वगैरे |
4. केरकचरा | केर, कचरा वगैरे |
3. शब्दसिद्धी:
प्रश्न 1.
उपसर्गघटित व प्रत्ययघटित यांत वर्गीकरण करा:
(नि:स्वार्थी, दिशाहीन, व्यावहारिक, प्रयत्न)
उत्तर:
उपसर्गघटित प्रत्ययघटित नि:स्वार्थी
दिशाहीन व्यावहारिक प्रयत्न
4. वाक्प्रचार:
प्रश्न 1.
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
1. आयुष्य गमावणे
2. कोलमडून पडणे.
उत्तर:
1. आयुष्य गमावणे - अर्थ : जीवन संपवणे.
वाक्य: स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक क्रांतिवीरांनी देशासाठी आपले आयुष्य गमावले.
2. कोलमडून पडणे - अर्थ : मनाने ढासळणे.
वाक्य: अतिवृष्टीने पिकांचा नाश झाल्यामुळे अनेक शेतकरी कोलमडून पडले.
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
1. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
पुढे दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा :
उदा., 1. सापेक्ष × निरपेक्ष, 2. अनावृष्टी × अतिवृष्टी.
1. आरोह
2. दीर्घायुषी.
उत्तर:
1. आरोह × अवरोह
2. दीर्घायुषी × अल्पायुषी.
प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा:
एकवचन | टेकडी | वर्ग | ||
अनेकवचन | क्षेत्रे | ज्योती |
उत्तर:
एकवचन | टेकडी | क्षेत्र | वर्ग | ज्योत |
अनेकवचन | टेकड्या | क्षेत्रे | वर्ग | ज्योती |
प्रश्न 3.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून प्रत्येकी चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. जाणीवपूर्वक
2. शिफारस.
उत्तर:
1. (1) जाणीव (2) पूर्व (3) जावक (4) कणी.
2. (1) फार (2) फास (3) रस (4) सर.
2. लेखननियम:
प्रश्न 1.
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमांनुसार शुद्ध लिहा:
- दुरदृष्टि
- ओपचारिक
- स्थीतीशिल
- नीमुर्लन
- भातूकलि
- आदराजलि.
उत्तर:
- दूरदृष्टी
- औपचारिक
- स्थितिशील
- निर्मूलन
- भातुकली
- आदरांजली.
३. विरामचिन्हे:
प्रश्न 1.
नावे लिहा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिली आहेत.)
1. [,] स्वल्पविराम
2. [;] अर्धविराम
प्रस्तावना:
उत्तम कांबळे हे प्रसिद्ध लेखक व पत्रकार. त्यांना साहित्यनिर्मितीसाठी व पत्रकारितेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या साहित्यात गरीब, कष्टकरी सामान्य जनतेच्या जीवनाला प्राधान्याने स्थान मिळाले आहे. दीनवाणे, अगतिक जीवन लाभलेल्या तळागाळातील लोकांविषयी लेखकांना खूप आस्था आहे.
अनुताई वाघ (17 मार्च 1910-17 सप्टेंबर 1992) यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अनेक हालअपेष्टा सोसल्या. त्यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठात करून देण्यात आला आहे.
शब्दार्थ:
1. व्रतस्थ – कठोरपणे एखादया व्रताचे आचरण करणारे.
2. निरपेक्ष – कार्य केल्याच्या बदल्यात काहीतरी मिळण्याची अपेक्षा न ठेवता.
3. स्थितिशील – कोणताही बदल होऊ न देता, आहे त्याच स्थितीत राहण्याची वृत्ती असलेले.
4. औपचारिक शिक्षण – पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे शाळांमध्ये क्रमाने दिले जाणारे रूढ शिक्षण.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:
1. कपाळावरील कुंकू पुसले जाणे – पतीला मृत्यू येणे, विधवा होणे.
2. डोळ्यांतले अश्रू पुसणे – दुःख दूर करणे, दुःख दूर करण्यास मदत करणे.
3. भविष्याचा वेध घेणे – भावी काळात काय काय होऊ शकेल याचा अंदाज बांधणे.
Download PDF
Maharashtra Board Solutions for Class 9- Marathi Kumarbharati (Part- 1): Chapter 5- एक होती समई
Chapterwise Maharashtra Board Solutions Class 9 Marathi Kumarbharati :
Part- 1
- Chapter 1- वंद्य ‘वन्दे मातरम्’
- Chapter 2- संतवाणी (अ) जैसा वृक्ष नेणे- संत नामदेव
- Chapter 2.2- संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर-संत जनाबाई
- Chapter 3- कीर्ती कठीयाचा दृष्टान्त
- Chapter 4- नात्यांची घट्ट वीण
- Chapter 5- एक होती समई
- Chapter 5.1- हास्यचित्रांतली मुलं
Part- 2
- Chapter 6- या झोपडीत माझ्या
- Chapter 7- दुपार
- Chapter 8- अभियंत्यांचे दैवत-डॉ. विश्वेश्वरय्या
- Chapter 9- मी वाचवतोय
- Chapter 10- यंत्रांनी केलं बंड
- Chapter 10.1- इंग्लंडचा हिवाळा
Part- 3
- Chapter 11- मातीची सावली
- Chapter 12- महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया
- Chapter 13- थोडं ‘आ’ भारनियमन करूया
- Chapter 14- आदर्शवादी मुळगावकर
- Chapter 15- निरोप
- Chapter 15.1- ‘बिग 5’ च्या सहवासात
Part- 4
- Chapter 16- वनवासी
- Chapter 17- ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ
- Chapter 18- हसरे दुःख
- Chapter 19- प्रीतम
- Chapter 20- आपुले जगणे…आपुली ओळख!
- Chapter 20.1- विश्वकोश
FAQs
You can download the Maharashtra State Board Books from the eBalbharti official website, i.e. cart.ebalbharati.in or from this article.
Students can get the Maharashtra Books for primary, secondary, and senior secondary classes from here. You can view or download the Maharashtra State Board Books from this page or from the official website for free of cost. Students can follow the detailed steps below to visit the official website and download the e-books for all subjects or a specific subject in different mediums.
Step 1: Visit the official website ebalbharati.in
Step 2: On the top of the screen, select “Download PDF textbooks”
Step 3: From the “Classes” section, select your class.
Step 4: From “Medium”, select the medium suitable to you.
Step 5: All Maharashtra board books for your class will now be displayed on the right side.
Step 6: Click on the “Download” option to download the PDF book.
As of now, the MSCERT and Balbharti are responsible for the syllabus and textbooks of Classes 1 to 8, while Classes 9 and 10 are under the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE).
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, conducts the HSC and SSC Examinations in the state of Maharashtra through its nine Divisional Boards located at Pune, Mumbai, Aurangabad, Nasik, Kolhapur, Amravati, Latur, Nagpur and Ratnagiri.
About Maharashtra State Board (MSBSHSE)
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education or MSBSHSE (Marathi: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ), is an autonomous and statutory body established in 1965. The board was amended in the year 1977 under the provisions of the Maharashtra Act No. 41 of 1965.
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education (MSBSHSE), Pune is an independent body of the Maharashtra Government. There are more than 1.4 million students that appear in the examination every year. The Maha State Board conducts the board examination twice a year. This board conducts the examination for SSC and HSC.
The Maharashtra government established the Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research, also commonly referred to as Ebalbharati, in 1967 to take up the responsibility of providing quality textbooks to students from all classes studying under the Maharashtra State Board. MSBHSE prepares and updates the curriculum to provide holistic development for students. It is designed to tackle the difficulty in understanding the concepts with simple language with simple illustrations. Every year around 10 lakh students are enrolled in schools that are affiliated with the Maharashtra State Board.